सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2023-24
जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी सन 2023-24 वर्षाकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करणेबाबत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, पुणे जिल्हा परिषद पुणे यांचे जा.क्र.जिप/सक/शिष्य/ऑफलाईन/प्रपत्र/2023-24/1915. दिनांक 29/08/2023 चे पत्र काढलेले आहे. सदर पत्रानुसार
तसेच मा. प्रशासकीय अधिकारी, शिक्षणविभाग (प्राथमिक), पुणे मनपा यांच्या जा. क्र. 2885 दिनांक 31/08/2023 च्या परिपत्रकानुसार
जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे या विभागामार्फत खालीलप्रमाणे इयत्ता 1 ते 10 मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात.
- इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
- इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
- शिक्षण फी, परिक्षा फी प्रतिपुर्ती योजना (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनु. जमाती)
- माध्यामिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनु. जमाती) इ. 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
- अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती (पात्र असणाऱ्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीस ऐवजी या शिष्यवृत्तीचा विचार करावा)
- इ. 9 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
- इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
वरील योजनांसाठी विहित प्रपत्रांचे नमुने व योजनांचे माहितीपत्रक खालील लिंक वरून डाऊनलोड करून घ्यावी.
Download From following link
- विहित प्रपत्रांचे नमुने ((Ms Excel Sheet Format)
- आधार संलग्न केलेची प्रिंट (शालेय दप्तरी ठेवावी.)
- इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विद्यार्थांना भारत सरकार ची डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व आशण मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. शासन निर्णय
- इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकत असणा-या इतर मागास प्रवगातील विद्यार्थांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. शासन निर्णय
- विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) व इतर मागास प्रवगातील विद्यार्थांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना यासाठी जातीचा दाखला आणि पालाकांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
![]() |
शिबिराचे वेळापत्रक सन 2023-24
1 टिप्पणी:
खूप छान फॉरमॅट दिला आहे सर आपण धन्यवाद गुणवत्ता शिष्यवृत्ती साठी सर्व प्रवर्गाचे विद्यार्थी एकाच शीट वर घ्यायचे आहेत का कारण त्यासाठी स्वतंत्र शीट नाहित
टिप्पणी पोस्ट करा