शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०२३

सानुग्रह अनुदान व दिवाळी भेट 2022-23_Bonus 2023-24

            पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना, शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना तसेच बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, शिक्षक, शिक्षण सेवक सन २०२२-२३ च्या मुळ वेतन महागाई भत्ता यावर ८.३३% + विहीत दराने सानुग्रह अनुदान आदा करणेबाबत पुणे महानगरपालिका जावक क्र.:- 2940 दिनांक :-  9/10123 नुसार कार्यवाही करण्यात यावी असे कळविण्यात आलेले आहे.

                            पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर . सेवकांना बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक तसेच शिक्षण सेवकांना सन २०२२ - २०२३ च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३% + र.रु. २१००० /- इतके सानुग्रह अनुदान उपस्थितीचे प्रमाणात आदा करण्यात येणार आहे.

चला तर आपले सानुग्रह अनुदान खालील एक्सेलद्वारे काढू या!


सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!



महानगरपालिका परिपत्रकः-  सानुग्रह अनुदान परिपत्रक


डाऊनलोड लिंकः- सानुग्रह अनुदान 2022-23

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

निकालपत्रक - सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता 1 ली ते 8 वी शैक्षणिक वर्ष सन 2023-24

    निकालपत्रक - सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन 

इयत्ता 1 ली ते 8 वी 

शैक्षणिक वर्ष सन 2023-24


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता 1 ली ते 8 वी ची Excel फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील रंगीत लिंक वर क्लिक करा .

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन इयत्ता 1 ली ते 8 वी  

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2023-24 : Savitribai Phule Scholarship Scheme 2023-24

  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2023-24

                           

               जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी सन 2023-24 वर्षाकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करणेबाबत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, पुणे जिल्हा परिषद पुणे यांचे जा.क्र.जिप/सक/शिष्य/ऑफलाईन/प्रपत्र/2023-24/1915. दिनांक 29/08/2023 चे पत्र काढलेले आहे. सदर पत्रानुसार

                तसेच मा. प्रशासकीय अधिकारी, शिक्षणविभाग (प्राथमिक), पुणे मनपा यांच्या जा. क्र. 2885 दिनांक 31/08/2023 च्या परिपत्रकानुसार

                जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे या विभागामार्फत खालीलप्रमाणे इयत्ता 1 ते 10 मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात.

  1. इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
  2. इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
  3. शिक्षण फी, परिक्षा फी प्रतिपुर्ती योजना (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनु. जमाती)
  4. माध्यामिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनु. जमाती)  इ. 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
  5. अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती (पात्र असणाऱ्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीस  ऐवजी या शिष्यवृत्तीचा विचार करावा)
  6. इ. 9 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
  7. इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
  8. इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती


 

                 वरील योजनांसाठी विहित प्रपत्रांचे नमुने व योजनांचे माहितीपत्रक खालील लिंक वरून  डाऊनलोड करून घ्यावी.

                         Download From following link






  • इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विद्यार्थांना भारत सरकार ची डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व आशण मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. शासन निर्णय 
  • इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकत असणा-या इतर  मागास प्रवगातील विद्यार्थांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व  शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. शासन निर्णय 
  • विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT)  व इतर  मागास प्रवगातील विद्यार्थांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व  शिष्यवृत्ती योजना यासाठी जातीचा दाखला आणि पालाकांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. 


सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2023-24 : Savitribai Phule Scholarship Scheme 2023-24






काही लक्षात घ्यावयाच्या महत्त्वाच्या बाबी

अ)    वरील योजनेंतर्गत सोबत जोडलेल्या विवरणपत्र "अ" हे मराठीतून DVOT SUREKH MR या FONT मध्ये व विवरणपत्र "ब" हे इंग्रजीमधून TIMES NEW ROMAN या FONT मध्येच सर्व रकाने भरून असावे.
आ) १ ते ९ मुद्यांसह मुख्याध्यापकांचे स्वाक्षरी व शिक्यासह प्रस्ताव Soft copy Hard copy पेन ड्राईव्ह मध्ये शिबिराच्या दिनांक वेळेस सादर करावे.
इ) विवरणपत्र "अ" व विवरणपत्र "ब" हे स्वतंत्र पानावर असावे.

ई)     कॅम्पचे वेळापत्रक खालीलप्रमाणे

शिबिराचे वेळापत्रक सन 2023-24



गुरुवार, ११ मे, २०२३

Income Tax Calculator FY 2023-24 AY 2024-25 (आयकर आर्थिक वर्ष 2023-24 मूल्यांकन वर्ष 2024-25)

 

       आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आयकर कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या आयकर वसुलीचे नवीन section 115BAC नुसार आर्थिक वर्ष 2023-24 च्या आयकर गणनेसाठी New Tax Regime व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत. त्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.

         सन 2023-24 या सालातील पगारदार व्यक्तींच्या वार्षिक उत्पन्नावर आयकर आकारणी करण्यासाठी excel sheet calculator देत आहे. 

            आपणास सन 2023-24 ची आयकर कर आकारणी करणे नक्कीच सोपे होईल अशी अशा करतो. यामध्ये 2020 पूर्वीच्या जुने कर नियम आणि 2020 नंतरच्या नवीन कर नियम अशा दोन्ही नियम प्रकारांच्या आधारे आपला आयकर काढता येणार आहे. 

           

New Tax Regime प्रमाणे आयकराचा तक्ता  

0 /- ते 3,00,000/-

टॅक्स नाही

3,00,001/- ते 6,00,000/-

5% (करपात्र उत्पन्न 7,00,000 पर्यंत 25000 /- रुपये रिबेट)

6,00,001/-  ते 9,00,000/-

15000 + 10 %

9,00,001/-  ते 12,00,000/-

45000 + 15 %

12,00,001/-  ते 15,00,000/-

90000 + 20 %

15,00,001/-  पासून पुढे

150000 + 30 %

Standard Deduction Rs. 50,000/- मिळेल.

कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीवर सूट मिळणार नाही.

 

 

Old Tax Regime प्रमाणे आयकराचा तक्ता  

0 /- ते 2,50,000/-

टॅक्स नाही

2,50,001/- ते 5,00,000/-

5% (करपात्र उत्पन्न 5.00,000 पर्यंत 12500 /- रुपये रिबेट)

5,00,001/-  ते 10,00,000/-

12500 + 20 %

10,00,001/-  पासून पुढे

125000 + 30 %

Standard Deduction Rs. 50,000/- मिळेल.

80C, 80D, 80CCD. 80G . सवलती मिळतील

 

 

 

                  Old Tax Regime व New Tax Regime यांची तुलनात्मक माहिती तक्ता


 

Slab

Old Tax Regime Slab Rates for FY 22-23 (AY 23-24)

New Tax Regime Slab Rates

Resident Individuals & HUF < 60 years of age & NRIs

Resident Individuals & HUF > 60 to < 80 years

Resident Individuals & HUF > 80 years

Before Budget 2023

(until 31st March 2023)

After Budget 2023

(From 1st April 2023)

₹0-₹2,50,000

NIL

NIL

NIL

NIL

NIL

₹2,50,000 -₹3,00,000

5%

(tax rebate u/s 87A is available)

NIL

NIL

5%

NIL

₹3,00,000-₹5,00,000

5%

(tax rebate u/s 87A is available upto Rs 5,00,000)

5%

(tax rebate u/s 87A is available upto Rs 5,00,000)

NIL

5%

(tax rebate u/s 87A is available upto Rs 5,00,000)

5%

₹5,00,000-₹6,00,000

20%

20%

20%

10%

5%

₹6,00,000-₹7,50,000

20%

20%

20%

10%

10%

(tax rebate u/s 87A is available upto Rs 7,00,000)

₹7,50,000-₹9,00,000

20%

20%

20%

15%

10%

₹9,00,000-₹10,00,000

20%

20%

20%

15%

15%

₹10,00,000-₹12,00,000

30%

30%

30%

20%

15%

₹12,00,000-₹12,50,000

30%

30%

30%

20%

20%

₹12,50,000-₹15,00,000

30%

30%

30%

25%

20%

>₹15,00,000

30%

30%

30%

30%

30%

 

या माहितीच्या खाली दिलेल्या लिंकच्या आधारे excel sheet calculator च्या सहाय्याने जुने कर नियम आणि नवीन कर नियम अशा दोन्ही नियम प्रकारांपैकी कोणता स्लॅब  स्वीकारणे फायदेशीर आहे हे आपल्याला कळेलयामुळे आपला फायदा  नक्कीच होईल. 

                आपणच व्हा आपले आयकर सल्लागार!

 

आपल्या सर्वांना यासाठी शुभेच्छा !!


Income Tax 2023-24



Click on Download for Excel Calculator


INCOME TAX CALCULATOR FY 2023-24 AY 2024-25

आयकर FY 2023-24 AY 2024-25


Income Tax Calculator FY 2023-24 AY 2024-25 

(आयकर आर्थिक वर्ष 2023-24 मूल्यांकन वर्ष 2024-25)