सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना 2020-21
जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांनी सन 2020-21
वर्षाकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
योजनेचे प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करणेबाबत दिनांक 30/09/2020 रोजी
पत्र काढलेले आहे. सदर पत्रानुसार
जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद पुणे या विभागामार्फत खालीलप्रमाणे
इयत्ता 1 ते 10 मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
योजना राबविल्या जातात.
- इ. 5 वी ते 7 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
- इ. 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
- शिक्षण फी, परिक्षा फी प्रतिपुर्ती योजना (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनु. जमाती)
- माध्यामिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, अनु. जमाती)
- अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती (सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ऐवजी या शिष्यवृत्तीचा विचार करावा)
- इ. 9 वी व 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
- इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विद्यार्थ्यांना भारत सरकारची डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
- इ. 5 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती (अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग)
वरील योजनांसाठी विहित प्रपत्रांचे नमुने व योजनांचे
माहितीपत्रक खालील लिंक वरून डाऊनलोड करून
घ्यावी.
Download From following link
- विहित प्रपत्रांचे नमुने ((Ms Excel Sheet Format)
- इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विद्यार्थांना भारत सरकार ची डॉ. आंबेडकर मॅट्रीकपूर्व आशण मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. शासन निर्णय
- इयत्ता 1 ते 10 वी मध्ये शिकत असणा-या इतर मागास प्रवगातील विद्यार्थांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू करणेबाबत. शासन निर्णय
- विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) व इतर मागास प्रवगातील विद्यार्थांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना यासाठी जातीचा दाखला आणि पालाकांचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
आ) ताक्त्यामधील सर्व
माहिती इंग्रजीमध्ये कॅपीटल अक्षरामध्ये (MsExcel Font – Times New Roman) भरून
द्यावी.
इ) प्रस्तावाची Hard
copy कॅम्पमध्ये तपासून घेऊन त्याची soft copy zppunescholarship2019@gmail.com
या मेल आयडी वर पाठवावी. तसेच कॅम्पमध्ये soft
copy pen drive मध्ये आणायची आहे. pen drive मध्ये soft copy सदर केल्याशिवाय प्रस्ताव
स्वीकारण्यात येणार नाहीत.
ई) सोबत च्या प्रपत्रात
माहिती दोन प्रतीत तयार ठेवावी व कॅम्पमध्ये सादर करावी.
उ) कॅम्पचे वेळापत्रक
खालीलप्रमाणे
शिष्यवृत्ती कॅम्पचे वेळापत्रक |
||
अ. क्र. |
शाळेचे नाव |
दिनांक |
1 |
विठ्ठलराव शिवरकर माध्यमिक विद्यालय, भैरोबानाला, हडपसर, पुणे |
12/10/2020 व 13/10/2020 |
2 |
मॉर्डन हायस्कूल, शिवाजीनगर, पुणे |
14/10/2020 व 15/10/2020 |
3 |
हुजूरपागा हायस्कूल, लक्ष्मी रोड, पुणे |
16/10/2020 व 19/10/2020 |
4 |
पीसीएमसी माध्यमिक विद्यालय, फुगेवाडी, पिंपरी, पुणे |
20/10/2020 व 21/10/2020 |
5 |
म्हाळसाकांत हायस्कूल, आकुर्डी, पुणे |
22/10/2020 व 26/10/2020 |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा