मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना
Pre Matric
Scholarship Scheme
शैक्षणिक
वर्ष सन 2024-25
विषयः- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरितामॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष 2024-25 (सन 2023-24 पासून ऑनलाईन पद्धतीने)
संदर्भ – 1) समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र
राज्य जा.क्र. सकआ/शिक्षण/मॅट्रिकपूर्व शिष्य./का4-अ/2023-24/344 दिनांक
01/02/2024
2)
पुणे जिल्हा परिषद, पुणे जा.क्र.जिप/सकवी/शिष्य/ऑनलाईन/2024-25/2539
दिनांक21/10/2024
3)
पुणे जिल्हा परिषद जा.क्र./सकवी/शि,य/ऑनलाईन/2024-25/2538 दिनांक 21/10/2024
वरील संदर्भ पत्रा (3) नुसार दिनांक
23/10/2024 रोजी हुजुरपागा शाळेत मार्गदर्शन शिबिर पार पडले.
शिबिरातील काही ठळक मुद्दे-
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन
पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत.
1)
इ. ९ वी १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
2)
साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या
पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता १ ली ते १० वी)
3)
इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी ते १०वी मधील अनुसूचित जातीच्या
विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
4)
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क.
5)
माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
शाळांनी करावयाच्या बाबी –
1) शाळांनी
https://prematric.mahait.org/Login/Login या वेबपेज वर जाऊन शाळेचे Login करावे.
Login ID –
Pre_SE27xxxxxxxxx_Principal
(27xxxxxxxxx या ठिकाणी
शाळेचा पूर्ण UDISE क्रमांक लिहावा)
Password
- Pass@123
2) मुख्याध्यापक / शिष्यवृत्तीचे काम करणारे शिक्षक /क्लार्क यांच्या 1) आधारकार्ड verified करून पासवर्ड बदलबून घ्यावा.
3) नवीन
पासवर्डने पुन्हा Login करून School
Profile पूर्ण करावे.
4) सध्या
Student
Profile मध्ये 2023-24 चे विद्यार्थी दिसत आहेत. जे सरल पोर्टलवरून
घेतलेले आहे.
5) शैक्षणिक
वर्ष सन 2023-24 चे विद्यार्थी update करण्याची मुदत 25 ऑक्टोबर 2024 ला संपत
असून यापूर्वी शाळांनी विद्यार्थी update केले नसल्यास असे
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील.
6) 25 ऑक्टोबर 2025 नंतर शैक्षणिक वर्ष सन 2024-25 साठी पोर्टल सुरू सुरू झालेले आहे.
7) जे
विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र आहेत असे सरेव विद्यार्थी update करणे आवश्यक आहेत. त्यासाठी विद्यार्थी आधारकार्ड असणे आवश्यक आहे. तसेच
आई किंवा वडील यांचेही आधारकार्ड आवश्यक आहे.
8) वरील
शिष्यवृत्ती क्रमांक 1 ते 4 पैकी कोणतीही एक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यास देय आहे.
9) परंतू
अपवादात्मक असे की शिष्यवृत्ती क्रमांक 1,3,4 पैकी कोणतीही एक आणि क्रमांक 2 अशा
दोन शिष्यवृत्तीस विद्यार्थी पात्र असल्यास जी शिष्यवृत्ती जास्त रकमेची आहे त्या
विद्यार्थी पात्र होईल.
10) माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित
जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
(इयत्ता 5 वी ते 10 वी) ही शिष्यवृत्ती + (अधिक) वरील 1 ते 4 पैकी पात्र शिष्यवृत्ती अशा दोन
शिष्यवृत्ती मिळण्यास विद्यार्थी पात्र असणार आहेत.
11) तरी शाळांनी शैक्षणिक वर्ष सन 2024-25 ची
विद्यार्थी माहिती update करून आपल्या
विद्यार्थांना या शिष्यवृत्तींचा लाभ करून द्यावा.
12) वरील संदर्भ परिपत्रके पहाण्यासाठी pravinjbhosale.blogspot.com या
ब्लॉग ला भेट द्या.
प्रविण
भोसले
पदवीधर
शिक्षक
शिक्षण
विभाग (प्राथ), पुणे मनपा
तथा
सरचिटणीस
महा.
राज्य प्राथ. शिक्षक संघ, शाखा पुणे शहर